Untitled Document

header

Untitled Document

vikas antre    जन्माला येणारा प्रत्येक माणूस अनेक भुमिकेत जगतो. पण या जगण्यात अनेकदा तो मी कोण ? हे विसरून जातो. इतिहासाच्या पानात याचे अनेक दाखले सापडतील. मी ही या भूतलावर जन्माला आलेल्या कोट्यावधी जीवांपैकी एक जीव. खरी हिच माझी पहिली ओळख. जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासापासून सुरू झालेला जीवनगाडा ओढण्याची खरी प्रेरणा मिळाली ती संघर्षातून.

     खरं तर विद्यार्थीदशेतच मला अनेकदा सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या वक्तृत्वाच्या छंदातून हा छंद, आवड जोपासण्यासाठी वाचु लागलो. त्यामुळे जीवनाला ह्वा, पाणी, अन्न, पद, प्रतिष्ठा, पैसा याबरोबरच विचारांचीही गरज असण्याचे जाणवले. त्या क्षणापासून माझी ओळख मला झाली. जगाच्या पटलावर जे काही चांगले विचार असतील त्यांचे जतन व प्रसार करण्याचा विचार साधक माझ्यात दडण्यात त्याला मी ओळखलय, आता पत्रकार म्हणून जगताना माझ्या हातून ’विचार साधनेचे’ कार्य घडवण्याचा मी प्रयत्न करतोय.

     मी सुद्धा इतरा प्रमाणे गुण दोष असलेला माणूस आहे. ’मी’ च्या चष्म्यातुन स्वत:चे मुल्यांकन अचुक घेवू शकत नाही पण तरीही मला असे वाटतं माझी निरीक्षण क्षमता हा माझा सर्वात मोठा प्लस पॉईंट. सहित्याच्या प्रांतात ’झेंडुची फुलं’ हा कथा संग्रह लिहून घुसखोरी केली. अर्थत त्याला पत्रकारीतेचे व्हीजनने जग व समाज जवळचा अन लांबचा हे नुसते दिसले नाही तर यातील अंतरही समजू शकते. मी जरा जास्तच भावना प्रधान असल्याने एखाद्याच्या जीवनातील सुख दु:खांची झालर पटकन ओळखू शकतो.

     या अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या गुणाबरोबर माझे अवगुणही आहेत. मी ठरवलेली एखादी गोष्ट पूर्ण न झाल्यास मी चिडतो. अनोळखी माणसाशी स्वत:हून ओळख करून घ्यायला अडखळतो. या गुणदोषांच्याच भांडवलावर जीवनाची लढाई लढायची.

    आधी उल्लेख केल्याप्रमाणे विचार साधनेसाठीच तुम्ही म्हणाल, विचार साधनेने काय पोट भरतं काय? ठीक आहे तुम्ही म्हणता तसं थोडा वेळ नसत भरत असही ग्राह्य धरू. पण आज भौतिक सुखाच्या अतिरेकामुळे भरल्या पोटीही माणसं उपाशीच आहेत. जग जवळ आलं माणसं दूर गेलीत. माणसांचा बाजार भरला पण माणुसकी विकत मिळेना. समाजात चांगला विचार आहे पण तो लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे नितीची जागा अनिती घेतेय, पैसा संपत्ती यावर दरोडे घालणाऱ्या दरोडेखोरांची संख्या वाढली. हे तर नुसते दरोडेखोर आहेत. पण आज केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सामान्य जनतेत बुद्धीभेद करून समाजाच्या वैचारीक स्वास्थ्यावर दरोडे घालणारे तर महादरोडेखोर आहेत. एवढे कुकृत्य करूनही ही मंडळी उजळ माथ्याने फिरत आहेत.हे थोपविण्याची गरज आहे विचार साधनेची.

     लिखाण हा विचार साधनेला समाजापर्यंत पोहोचविण्याचा सोपा व प्रभावी मार्ग आहे. याच मार्गाचा अवलंब करून मी लढतो आहे. एक बातमी लिहून , एक पुस्तक लिहून समाज बदलू शकत नाही.विचाराची साधना पूर्ण होऊ शकत नाही. पण अंधाऱ्या खोलीत ज्या कोपऱ्यात पणती लावली जाते, त्या कोपऱ्यातील अंधाराचे अस्तित्व नष्ट होते. कदाचित माझी धडपड त्या पणती इतकीच असेल. माझी विचार साधना जगाच्या पसाऱ्यात एक अडगळीचा कोपरा असेल पण न जाणो भविष्यात हा कोपरा नव्या विचार क्रांतीचा नवा उगमस्थानही होउ शकेल.

   

 

Untitled Document

All rights reserved