Untitled Document

header

Untitled Document

श्रीरामपूर प्रेस क्लब श्रीरामपूर प्रेस क्लबची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली. त्याआधी १९६५ मध्येच श्रीरामपूर पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली होती. श्रीरामपूर शहराच्या विकासाबरोबर ८० च्या सुमारास विविध वृ्त्तपत्रांची कार्यालये श्रीरामपूरात आल्याने पत्रकारांची संख्या वाढली. त्यामुळे नियोजनबद्ध कामासाठी प्रेसक्लबचे विद्यमान अध्यक्ष अॅड. शंकरराव आगे, ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, अॅड. जठार आदींनी मिळून श्रीरामपूर प्रेस क्लबची स्थापना केली. श्रीरामपूरातील पत्रकारांनी आपल्या रोखठोक पत्रकारीतेने महाराष्ट्रात पत्रकारीतेची एक वेगळी ओळख निर्माण केली. शहरात घडलेल्या घटनांचे वार्तांकन हे पत्रकारांचे मुख्य काम असले तरी श्रीरामपूरातील पत्रकारांनी ज्या ज्या वेळेस श्रीरामपूर शहरावर संकट ओढवले त्या त्या वेळेस स्व्त:च्या लेखणीबरोबर प्रत्यक्ष कृतीतूनही मदत केली आहे. शहरातील उत्सव असो किंवा कुठलेही सामाजीक काम असो, पत्रकारांनी आपले दायीत्व जपले आहे. या विविध सामाजिक कामांबरोबर प्रेसक्लबच्या व नगरपालिकेच्या सौजन्याने स्व. पत्रकार वसंतराव देशमुख यांच्या स्मृतीदि्नानिमित्त जिल्हास्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रेसक्लब दरवर्षी आयोजीत करतो. पत्रकारीतेत चांगले काम करणा-या पत्रकारांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. अलीकडेच नगरपालीकेच्या माध्यमातून वार्ड नं. ७ मध्ये पत्रकार भवनासाठी १० गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. लवकरच या जागेत पत्रकार भवनाच्या कामास आरंभ होणार आहे. श्रीरामपूर प्रेसक्लबचे कार्य भविष्यातही विस्तारणार आहे.

अॅड. शंकरराव आगे


हे श्रीरामपूर प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष असून श्रीरामपूरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. दैनिक जनसत्त मधून त्यांनी सन १९६४ साली पत्रकारीतेला आरंभ केला. त्यानंतर त्यांनी दैनिक गांवकरी तालुका प्रतिनिधी म्हणून काम केल्यावर, स्वत:चे साप्ताहिक विठ्ठलप्रभा, प्रवरा टाईम्स, दै. श्रीरामपूर एक्सप्रेस, जय बाबा काढून संपादक म्हणून या दैनिकाचे यशस्वी काम पाहत आहे. पत्रकारीतेचा त्यांना ४५ वर्षांचा अनुभव असून शोध पत्रकारीतेबरोबर समाज कारणाचे वार्तांकन करण्यात आवड आहे.
जन्म तारीख : २३ सप्टेंबर
संपर्क कमांक : (२४२२) २२२०३५ / २२३३०३

रमेश कोठारी


श्रीरामपूरातील ज्येष्ठ पत्रकार व प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष. त्यांनी दैनिक समाचार, साप्ता, श्रीरामपूर टाईम्स, दै. नगर टाईम्स, नवा मराठा, दै. सार्वमत या वृत्तपत्रात काम केले असून सध्या ते दै. लोकमत्चे त ालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारीतेबरोबर समाजकारणाचा अभ्यास करून राजकीय क्षेत्रात त्यांनी नगरसेवक, मर्चंट असोसिएशन्चे संचालक आदी अनेक संस्थांवर यशस्वीरीत्या काम पाहिले आहे. गेल्या ४० वर्षांपासून ते पत्रकारीतेत असून समाजकारणात ील वार्तांकन करण्यात त्यांना विशेष रूची आहे.
जन्म तारीख : २९ मार्च
संपर्क कमांक : ९४२२२२२५११

पद्माकर शिंपी


शिक्षकी पेशा सांभाळून यांनी गेले ३८ वर्षे पत्रकारीतेचा वसा यशस्वी जोपासला आहे. त्यांच्या पत्रकारीची सुरवात दै. तलवार मधून झाली. त्यानंतर त्यांनी दै. जनसत्ता, साप्ता. श्रीरामपूर टाईम्स, दै. सार्वमत. दै.सकाळ साठी बातमीदार म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते सायंदैनिक महाराष्ट्र निरोप्याचे काम पाहत आहेत. चालू घडामोडीचे वार्तांअक्न व विश्लेषण करण्यात त्यांना रस आहे.
जन्म तारीख : १ फ़ेब्रुवारी
संपर्क कमांक : ९४२३७८५८७४

मारुतराव राशीनकर


श्रीरामपूर मिडीयातील अभ्यासू व मार्गदर्शक पत्रकार ही यांची खरी ओळख. दै. सार्वमत मध्ये ३० वर्षे त्यांनी उपसंपादक, वरीष्ठ उपसंपादक या पदांवर काम करत. सार्वमतला आज तो एक वेगळा ग्रामीण बाज आहे त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सध्या ते दै. पुण्यनगरी (श्रीरामपूर कार्यालय) मध्ये वरीष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारीतेत त्यांना ३४ वर्षांचा अनुभव आहे. कृषी व क्राईम हे पत्रकारीतेतील त्यांचे आवडते प्रांत असून, मातीत राबणाऱ्या हातांना लेखणीच्या माध्यमातून बळ देणारा अशी त्यांची जिल्ह्यात ख्याती आहे.
जन्म तारीख : १५ ऑगस्ट
संपर्क कमांक : ९९२२९६१८६१

नंदकुमार सोनार


दै. सार्वमतचे संपादक वसंतराव देशमुख गेल्यानंतर सार्वमतच्या संपादक पदाची जबाबदारी यशस्वी सांभाळून सार्वमतला जिल्ह्याचे मुखपत्र यांनी बनविले. त्यांनी १९८६ साली दै. सार्वमत मध्ये उपसंपादक पदावर आपल्या पत्रकारीतेस सुरवात केली. सार्वमतला नवा चेहरा देण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच दै. सार्वमतने युवा मंच, नजराणा महिला मंच, करीअर महोत्सव आदी सामाजिक उपक्रम राबविले. सध्या ते अहमदनगर जिल्हा पत्रकार भवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून जागरण व आरपार हे त्यांचे स्तंभलेख विशेष गाजले आहेत.
जन्म तारीख : २६ जानेवारी
संपर्क कमांक : ९८२२७५३२१७

अशोक तुपे


विद्यार्थी दशेपासून यांनी पत्रकारीतेला आरंभ केला. लोकमत युवा स्पंदन महाविद्यालयीन परतिनिधी म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दै. रामभूमीसाठी श्रीरामपूर बातमीदार , दै. सार्वमतमध्ये बातमीदार तसेच उपसंपादक म्हणून ११ वर्षे काम केले. समाजातील अपप्रवृत्तींवर आपल्या लेखणीतून रोखठोक हल्ले करणारा पत्रकार म्हणून त्यांनी राज्यात ख्याती मिळविली. प्रसार माध्यमातील अपप्रवृत्तींची त्यांना विशेष चीड असून ती दूर करण्याचे कामही ते करत आहेत. तरूण पत्रकारांना व राज्यातील द्रष्ट्या पत्रकारांत पोहोचलेले हे नांव असून त्यांना २६ वर्षे पत्रकारीतेचा अनुभव आहे. सध्या ते दै. लोकसत्ताचे वरीष्ठ बातमीदार म्हणून काम करत आहेत.
जन्म तारीख : ९ सप्टेंबर
संपर्क कमांक : ९४२२७९७५२५

रमण मुथा


श्रीरामपूर शहरालाच कुटूंब मानणारा पत्रकार , यांची पत्रकारीतेची सुरवात दै. नवा मराठा मध्ये झाली. आजही ते नवा मराठाचेच श्रीरामपूर प्रतिनिधी म्हणून काम बघत आहेत. गेल्या ३७ वर्षांचा त्यांना पत्रकारीतेचा अनुभव आहे. राजकीय व क्राईम वार्तांकनात त्यांना विशेष रूची आहे.
जन्म तारीख : १ जानेवारी
संपर्क कमांक : ९८९००८९४००

मिलिंद साळवे


एस.वाय.बी.ए. ला शिक्षण घेत असताना यांनी बातमीदार म्हणून काम करण्यास सुरवात केली. दै. नवा मराठा उपसंपादक, दै. सकाळ बातमीदार, महानगर चीफ रिपोर्टर असे काम पहिल्यावर सध्या ते दै. लोकमत (श्रीरामपूर कार्यालय) वरीष्ठ उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. विकास वार्ता हा त्यांचा पत्रकारीतेतील आवडता प्रांत आहे. त्याचबरोबर शोध पत्रकारीतेत त्यांचा विशेष हातखंडा आहे. मोजके बोलणे व आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे त्यांनी पत्रकारीतेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाय नेम बातमी कशी असावी हे त्यांच्या लिखाणातून समजते.
जन्म तारीख : ६ मे
संपर्क कमांक : ९८५०९६२५३५

अशोक गाडेकर


ग्रामीण भागातून येवूनही बिनधास्त पण समाजाभिमुख लिखाण ही त्यांची खास ओळख. त्यांनी दै. गांवकरी, दै. सार्वमत, केसरी, क्रांतीदूत, तरूण भारत, लोकसत्ता आदी वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले आहे. सोज्वळ स्वभावामुळे माणसे जोडण्याची त्यांना विशेष कला आहे. क्राईम व राजकारण हे पत्रकारीतेतील त्यांचे आवडते क्षेत्र आहे. या क्षेत्राचा २० वर्षांचा अनुभव आहे.
जन्म तारीख : १ एप्रिल
संपर्क कमांक : ९६२३४४५०५१

विष्णू वाघ


संयमी व अभ्यासू पत्रकार यांनी पत्रकारीतेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वृत्तपत्रात जाहिरात विभागात दै. लोकसत्ता, गांवकरीमध्ये काम केल्यावर त्यांचा ओढा पत्रकारीतेकडे वाढल्याने त्यांनी २००१ पासून दै. गांवकरीमध्ये उपसंपादक म्हणून काम करण्यास सुरवात केली. सध्या ते दै. पुढारी (श्रीरामपूर कार्यालय) मुख्य उपसंपादक म्हणून काम करत आहेत. पत्रकारीतेच्या राजकारण या क्षेत्रातील वार्तांकन कत्रण्यात त्यांना विशेष रस आहे.
जन्म तारीख : १८ डिसेंबर
संपर्क कमांक : ९३७२०७३०६५

सुनिल नवले


शांत परंतु प्रसंगी आक्रमक स्वभाव असूनही त्यांनी सर्व स्तरात दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. हातात घेतलेल्या विषयाच्या मुळापर्यंत जावून तो सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा पत्रकार असून त्यांनी दै. सार्वमत, लोकसत्ता मध्ये काम केले असून सध्या ते दै. सकाळ (सकाळ कार्यालय) मध्ये वरीष्ठ बातमीदार म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारीतेचा त्यांना १७ वर्षांचा अनुभव असून कृषी पत्रकारीतेत वार्तांकन करण्याची त्यांना आवड आहे.
जन्म तारीख : २३ जुलै
संपर्क कमांक : ९८८१९३३९३१

बाळासाहेब भांड


मोजक्या श्ब्दात तरीही सर्वसमावेश्क बातमी लिहिणारा पत्रकार ही यांची खास ओळख आहे. यांनी दै. केसरी, गांवकरी, नगर टाईम्स मध्ये बातमीदार म्हणून काम केले आहे. दै. सार्वमत मध्ये उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर दै. सामना, पुढारी व सध्या इंग्रजी वृत्तपत्र डी.एन.ए साठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारीतेचा त्यांना २५ वर्षांचा अनुभव असून श्रीरामपूर प्रेस क्लबच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. राजकारण व क्राईम ही त्यांची मुख्य वार्तांकनाची क्षेत्रे आहेत.
जन्म तारीख : १ जून
संपर्क कमांक : ९४२३४६१४९९

बाळासाहेब आगे


वडील पत्रकारीतेत असल्याने वयाच्या १० व्या वर्षापासूनच घरातून पत्रकारीतेचे बाळकडू मिळाले. त्यामुळे आज ते पत्रकारापासून संपादक पदापर्यंत पोहोचू शकले. एखाद्या विषयातील बातमी तात्काळ क्लिक होणे हा त्यांचा विशेष प्लस पॉईंट आहे. दै. गांवकरी तालुका प्रतिनिधी, दै.सार्वमत उपसंपादक याच बरोबर त्यांनी या ठिकाणी काम केल्यानंतर स्वत:चे साप्ताहिक विठ्ठल प्रभात, दै. श्रीरामपूर एक्सप्रेस व सध्या दै. जय बाबाचे संपादक म्हणून ते काम पाहत आहेत. राजकीय क्राईम वार्तांकनाची त्यांना रूची आहे.
जन्म तारीख : २४ जुलै
संपर्क कमांक : ९८५०९२५००१

अनिल पांडे


नेहमी हसतमुख स्वभाव, दुसऱ्याला सदैव मदतीचा हात देण्याची वृत्ती व दांडगा जनसंपर्क या तीन गुणांमुळे यांनी पत्रकारीतेत अल्पावधीत झेप घेतली आहे. याना पत्रकारीतेचा १८ वर्षांचा अनुभव असून सध्या ते दै. प्रभात व केसरीसाठी श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. याआधी त्यांनी तरूण भारत, लोकसत्तासाठीही काम केले आहे. नागरी समस्यांचे वार्तांकन करण्यात त्यांना विशेष रूची आहे. पण केवळ एखादी नागरी समस्या बातमीपुरता विषय ठरू नये, तिची खरोखर सोडवणुक व्हावी यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील असतात.
जन्म तारीख : २८ डिसेंबर
संपर्क कमांक : ९४२२२३५५११

मनोज आगे


दे धडक बे धडक ही यांच्या पत्रकारीतेची स्टाईल असून यांनी साप्ता. विठ्ठलप्रभा, साप्ता. प्रवरा टाईम्स, दै. लोकमत मध्ये काम केले असून दै. सार्वमतमध्येही उपसंपादक म्हणून काम केले आहे. सध्या ते श्रीरामपूर एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक व दै. जयबाबाचे संपादक म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारीतेचा त्यांना २५ वर्षांचा अनुभव असून शोध परकारीतेत त्यांना विशेष आवड आहे.
जन्म तारीख : ११ मे
संपर्क कमांक : ९८५०१२०९९०

करण नवले


नव्या पिढीतील झुंजार पत्रकार ही त्यांनी अवघ्या ३ वर्षांत निर्माण केलेली स्वत:ची वेगळी ओळख. त्यांनी दै. लोकमत, लोकपत्र, गांवकरी, पुण्यनगरी मध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते दै. गांवकरी (श्रीरामपूर कार्यालय) मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. स्पेशल स्टोरी व शोध पत्रकारीतेत त्यांना विशेष आवश आहे. ऋतुरंग मिडीया सर्व्हिसेस या नावाने त्यांची सेवा संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी इन्व्हेंट मॅनेजमेंट, डॉक्युमेंट्री आदी उपक्रम राबविले आहेत. पत्रकारीतेचा त्यांना ८ वर्षांचा अनुभव आहे.
जन्म तारीख : ११ एप्रिल
संपर्क कमांक : ९०११००८२५५

रवी भागवत


पत्रकारीतेत रमणारा माणूस इतर क्षेत्रात फारसा रमणे दुर्मिळच. पण भागवत यांच्या बाबतीत हा अपवाद म्हणावा लागेल. श्रीरामपूरच्या गोंधवणीसारख्या उपनगरातून आलेल्या या पोरानं चित्र काढण्याचा छंद जोपासत व्यंगचित्रकारीतेबरोबर पत्रकारीतेतही कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. भागवत यांच्या पत्रकारीतेची सुरूवात दै. सार्वमत मधून झाली. सार्वमतमध्ये त्यांनी शहर प्रतिनिधी, उपसंपादक म्हणून काम केले. त्याच बरोबर दै. पुढारीमध्येही त्यांनी वार्तांकन केले. सध्या ते दै. देशदूतसाठी काम पाहत आहेत.
जन्म तारीख : २१ डिसेंबर
संपर्क कमांक : ९२७१४४११९३

महेश माळवे


प्रतिकुल परीस्थितीतही इच्छाशक्ती असल्यास माणूस अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. याचे उदाहरण म्हणजे दैनिक सकाळचे बातमीदार महेश माळवे. यांनी दै. गांवकरी मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामाचा आरंभ केला. नवीन शिकण्याच्या जिज्ञासेपोटी वृत्तलेखन शिकून अलीकडेच पत्रकारीतेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. सध्या ते दै. सकाळचे (श्रीरामपूर कार्यालय) बातमीदार म्हणून काम पाहत आहेत. समाजकारणाचे वार्तांकन हा त्यांच्या वार्तांकनाचा आवडता प्रांत आहे. पत्रकारीतेचा त्यांना ५ वर्षाचा अनुभव आहे.
जन्म तारीख : २४ जुलै
संपर्क कमांक : ९९६०९६७०८०

विकास अंत्रे


ग्रामीण भागातील जनतेबरोबर पत्रकारांनाही उभारी देणारा हा पत्रकार आहे. दै. सार्वमतमध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. सध्या ४ वर्षांपासून दै. पुण्यनगरी (श्रीरामपूर कार्यालय) येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. सामाजिक वार्ता संकलनात विशेष आवड आहे.
जन्म तारीख : २२ एप्रिल
संपर्क कमांक : ९४२१५५६८८२

 

Untitled Document

All rights reserved