Untitled Document

header

Untitled Document

    पत्रकारीतेत आलेल्या चार पोरांनी पत्रकारीतेबरोबर गावही बदलण्याचा ध्यास घेतला. तो प्रत्यक्ष कृतीतही उतरविला. त्यासाठी स्थापन केलेल्या पंचक्रोशी पत्रकार संघाने सात्रळ पंचक्रोशी आपली एक वेगळी निर्माण केली ती आपल्या कामातून, हे करत असताना पत्रकार व पत्रकारीतेचा धर्मही जपला.

     सोनगाव-सात्रळ ही राहुरी तालुक्यातील गावे व लगतच्या गावांमुळे या परिसराला पंचक्रोशी म्हंटले जाते. यात सोनगाव, सात्रळ, धानोर, हनुमंतगाव व पाथरे या पाच गावांचा समावेश होत असल्याने ही पंचक्रोशी. खरं तर हा परीसर म्हणजे तीन तालुक्याच्या सीमारेषा जोडणारा पण तालुक्याची बंधने कधी पंचक्रोशीने पाळली नाही. पाचहि गावातील लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. म्हणूनच या भागातील पत्रकारांनी हाच धागा पकडून एका गावाच्या नावाने पत्रकार संघाची स्थापना करण्यापेक्षा पंचक्रोशी पत्रकार संघ याच नावाने स्थापना केली.

     पत्रकार संघ त्यातल्या त्यात ग्रामीण म्हंटल्यावर फक्त परीसरातील घटना, समस्यांचे वार्तांकन हेच प्रमुख कार्य असते, परंतु पंचक्रोशी पत्रकार संघाने ही ओळख मोडीत काढली. पत्रकार तर स्वत:चं गाव, परीसर, समय बदलू शकतो हेच या पत्रकार संघातील सदस्यांनी दाखवून दिले. आज इतर क्षेत्राप्रमाणे पत्रकारीताही व्यावसायीक झाली. स्पर्धा वाढली. पण तरीही याअ भाऊगर्दीत आपण या भागाचे देणे लागतो हा भाव जपण्याचे काम पंचक्रोशी पत्रकार संघाने केले आहे.

     अवघ्या पाच वर्षात गावासाठी धडपडणारी पोरं ही जी या भागातील पत्रकारांची ओळख निर्माण झाली ती त्यांनी ग्रामस्थांसाठी केलेल्या कामातुनच. पत्रकार संघाने गावातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, नृत्य, रांगोळी स्पर्धा भरवून ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांसाठी प्रशासन, समाजकारणातील मान्यवर व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली. पत्रकार दिन, शिक्षक दिन यासारखे उपक्रम राबवून समाजासाठी खपणाऱ्या हातांना बळ दिले. शोधणाऱ्याला वाट सापडतेच याचाच प्रत्यय या पत्रकार संघाचे काम पाहुन अल्याशिवाय राह्त नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रवरा परीसरात पहिल्यांदा पत्रकार संघाच्या विनंतीला मान देवून आले. त्यांच्या विचाराने रिचार्ज झालेले पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळींचा तो ज्वर आजही टिकून आहे.

     तुम्ही म्हणाल हे सर्व कशासाठी ? या कार्यक्रमामागचे अर्थकारण कसे? या प्रश्नांची उत्तरे प्रश्नातच संपली आहेत. या भागातील पत्रकारांना पत्रकारीतेबरोबरच समाजासाठी, गावासाठी दायीत्व दिव्याच्या भावनेतून साकारला. हा सर्व पसारा उभा केला. ही वाटचाल सुरू असताना पत्रकार संघाचा आमचा परम मित्र भागवत दिघे आमच्यातून गेला, पण त्या दु:खात कुढण्यापेक्षा आम्ही त्याचे विचार आजही जिवंत ठेवले आहेत. भविष्यातही गावाचं गावपण जपण्याची आपल्या मणसाला मोठं करण्याची आणि समाजाला प्रेरणा व ताकद देण्याची आमची वाटचाल सुरू राहणार आहे. आम्हाला गरज नाही कुठल्याही कुबड्यांची पण आदर मात्र हवा आहे. तुमच्या शुभेच्छा त्या तर देणार ना ?

राहुल गाडेकर


तरूण उत्साही पत्रकार असून गेल्या सहा वर्षांपासून पत्रकारीतेत आहेत. त्यांनी गावकरी मध्येही काही काळ काम केले आहे.

सध्या ते दैनिक पुण्यनगरीचे सात्रळ प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. शोध पत्रकारीतेत त्यांना विशेष रूची आहे.
जन्म तारीख : १२ मे
संपर्क कमांक : ९९२२३३९८३३

सुनील कुलकर्णी


सात्रळ पंचक्रोशीत हे ज्येष्ठ पत्रकार असून उत्तम जनसंपर्क हा त्यांचा प्लस पॉइंट म्हणावा लागेल.

त्यांनी दै. गावकरीसाठी काम केले आहे. सध्या ते दै. सार्वमतचे सात्रळ प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. राजकारणातील वार्तांकन हे पत्रकारीतेतील त्यांचे आवडते क्षेत्र आहे.
जन्म तारीख : १५ ऑक्टोबर
संपर्क कमांक : ९८८१७५१०१३

रूपक वाकचौरे


पत्रकारीतेत नव्या दमाचा, नवी धडपड करू पाहणारा हा पत्रकार आहे.

सध्या ते दै. एकमतसाठी सात्रळ प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. सामाजिक समस्यांचे वार्तांकनात त्यांना विशेष आवड आहे.
जन्म तारीख : २ ऑक्टोबर
संपर्क कमांक : ९९२२३३९९०३

शकुर तांबोळी


व्यावसायीक पत्रकारीतेच्या काळात पत्रकारीता एक आवड म्हणून सक्रीय करता येवू शकते याचे उदाहरण म्हणजे शकुर तांबोळी होय.

सध्या ते साप्ताहिक भडकत्या ज्वालासाठी सोनगाव प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. राजकीय वार्तासंकलनात त्यांना विशेष रस आहे.
जन्म तारीख : ३ जानेवारी

विकास अंत्रे


ग्रामीण भागातील जनतेबरोबर ग्रामीण पत्रकारांनाही उभारी देणारा हा पत्रकार आहे. दै. सार्वमत मध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. सध्या दै. पुण्यनगरी (श्रीरामपूर कार्यालय) येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक वार्तासंकलनात विशेष आवड आहे.
जन्म तारीख : २२ एप्रिल
संपर्क कमांक : ९९२२३३९९०३

 

Untitled Document

All rights reserved